जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते एकरा (बु) येथे विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण

199

The गडविश्व
एटापल्ली, १३ ऑक्टोबर : तोडसा अंतर्गत येणाऱ्या एकरा (बु) येथे आंगनवाड़ीचे लोकार्पण तसेच जि. प. शाळेच्या वर्गखोलीच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
तोडसा अंतर्गत येणाऱ्या एकरा (बु) येथे आंगनवाड़ी करीत ११.२८ लक्ष मंजूर झाले तसेच जि. प. शाळेच्या एका वर्गखोलीच्या बांधकामाकरिता १४ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सादर विकास कामाचे जि. प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आविस/ ग्रामसभा तालुका अध्यक्ष नंदूभाऊ मटामी, आविस सचिव प्रज्वल नागुलवार , माजी प, स, सदस्य सौ संगीता सुरेश दुर्वा, माजी सदस्य पं.स मंगेश हालामी, संचालक तथा सदस्य रमेश वैरागडे, ग्रा.पं.सदस्या मुन्नी ताई दुर्वा, सदस्य नानेश गावड़े, सुरेश दुर्वा, कन्ना नरोटी, सुधाकर नरोटी, रावजी, नाणेश दुर्वा, बाबूराव हलामि, अमित येनप्रेड्डीवार, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, उड़ेरा चे पोलीस पाटील अजय गावड़े, रघुनाथ तलांडे, कैलास उसेंडी सरपंच, आकाश उसेंडी, दीपंकर भक्त, दुलसा गावड़े व गावातील नागरीक उपस्थति होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here