The गडविश्व
अहेरी, ३ ऑक्टोबर : गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात बातकम्मा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शहरातच नाही तर खेड्यापाड्यात सुद्धा या उत्सवाला अनन्य महत्व आहे. नुकतेच अहेरी तालुक्यातील राजपूर प्याच ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या रामपूर चेक येथे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट दिली. या दरम्यान बतकम्मा उत्सवातील महिलांशी हितगुंज करून विविध विषयावर चर्चा केली.
तेलुगु भाषिक राज्यात बातकम्मा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील गावातही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. अशातचा माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी रामपूर चेक येथील बातकम्मा उत्सावाला भेट दिली.
यावेळी अहेरी राजपूर प्याच ग्रामपंचायत च्या सरपंचा सौ.मीनाताई वेलादी, सुरेश गंगादरीवार, शंकर पंदिलवार, दिवाकर छाटारे, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी आदि नागरिक उपस्थित होते.
