– बोरी येथे नविन मोहरम दर्गा
The गडविश्व
अहेरी, ३१ जुलै : तालुक्यातील बोरी येथील नविन मोहरम दर्गा इमारतीचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते पार पडले.
बोरी येथील मोहरम दर्गाची इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने नविन दर्गाचे बांधकाम लोकवर्गणीच्या माध्यमातून करण्यात आले. सदर मोहरम दर्गा बांधकामाकरिता मोहरम समितीकडे स्वतःची जमिन उपलब्ध नव्हती. मात्र या बांधकामास शेख परिवार यांनी आपल्या स्वमालकीची जमिन दान देऊन समाजापुढे आदर्श ठेवला आहे. बोरी येथील मोहरम हा सण सर्वधर्मीयांकडून मोठया उत्साहात साजरा केला जातो. बोरी येथील मोहरम सणामध्ये महाराष्ट्रासह, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यातील प्रत्येक जाती धर्माचे नागरीक एकत्रीत येऊन हा सण थाटामाटात साजरा केला जातो. विशेष म्हणजे बोरी येथील मोहरम हा सण ब्रिटिश काळापासून चालत आहे तीच परंपरा आजही सुध्दा बोरी वासीयांनी कायम ठेवली आहे. मोहरम दर्गा नविन इमारतीचे बांधकाम सुरू व्हावे यासाठी मोहरम भाविकांनी देणगीच्या स्वरूपात सहकार्य करून नविन मोहरम दर्गा उभारला आहे व या नविन मोहरम दर्गा चे लोकार्पण सोहळा २९ जुलै रोजी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून व मोहरम दर्गाचे प्रतिष्ठित नागरिक नारायण तलांडे, बरीकराव तलांडे, चंद्रू तलांडे, गोपाळा निकेसर, साईनाथ बोमकंटीवार यांच्यासह प्रकाश कोलपाकवार, अरुण कोलपाकवार, मधुकर वेलादी, पांडुरंग रामटेके, सुरेश गंगाधरीवार, सुनील कोलपाकवार, सतीश कोलपाकवार, साईनाथ कोलपाकवार, जयंत बोमकंटीवार, संतोष बोमकंटीवार, अखिल गजाडीवार, विनोद ओल्लालवार, अमोल कोलपाकवार, आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन मोहरम समिती अहेरी चे तालुका उपाध्यक्ष अखिल कोलपाकवार यांनी केले तर आभार मोहरम समितीचे सदस्य कविराज मोहुर्ले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी बोरी येथील मोहरम दर्गा चे सदस्य साई तलांडे, साईनाथ मडावी, दौलत मडावी, साईनाथ सोनटक्के, संतोष तलांडे, हरीचंद्र नीकेसर, ज्ञानेश्वर गड्डमवार, गोपाळा चांदेकर, अविनाश सोनटक्के, मुमताज शेख, सुभाष गंगूवार,लक्ष्मण आत्राम, शंकर गोरेडीवार,बाबुराव दुर्गे, विलास जंपलवार, मारोती सांगोजवार, आदींनी सहकार्य केले.
