जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जुना सोमनुर गावातील पुरपीडितांशी केली चर्चा

893

-अविस अध्यक्ष बानय्या जनगाम यांची प्रमुख उपस्थिती
The गडविश्व
सिरोंचा, ३१ जुलै : जुलै महिन्यात आलेल्या मुसळधार पाऊस आणि गोदावरी नदीवर बांधलेल्या मेडिगड्डा धरणातून सोडण्यात आलेल्या पाणी तसेच इंद्रावती नदीच्या पूर या तिहेरी संकटात सापडलेल्या जुना सोमनुर गावातील पूर पीडित गावकऱ्यांशी पूर परिस्थितीची आढावा घेत माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिप अध्यक्ष अजय कंकडालवार, अविस अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी भेट घेतली. पूरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
जुना सोमनुर गाव इंद्रावती व गोदावरी नदीच्या काठावर असल्याने या गावाला दरवर्षी पावसाळ्यात पुराचा फटका बसतो, मात्र मेडिगड्डा प्रकल्प झाल्यापासून जुना सोमनुर ला अधिकच पुराचा फटका बसत आहे. मेडिगड्डा प्रकल्पातुन सोडणाऱ्या पाणी आणि इंद्रावती नदीचा पूर यामुळे जुना सोमनुर गावात पाणी शिरल्याने गावातील नागरिकांना इतरत्र भटकंती करावा लागत आहे, आणि ही परिस्थिती दरवर्षी उदभवत असल्याने जुना सोमनुर गावातील नागरिक गाव सोडण्याचा मार्गावर असून पुरपीडित जुना सोमनुर गावाला पुनर्वसन करण्याची मागणी करत आहेत. माजी जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी प्रत्यक्षात जूना सोमनुर गावाला भेट देऊन गावातील पुरपीडितांशी पूर परिस्थिती बद्दल माहिती घेतली. तसेच पुरामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आदिवासी विद्यार्थी संघटनाचा पुरपीडितांसाठी लढा देणार असल्याची त्यांनी सांगितले.
यावेळी अविस अध्यक्ष बानय्या जनगाम, माजी सभापती सत्यन्ना मोडेम, सरपंच रमेश तैनेनी, धर्मय्या कोठारी, रमेश धर्मी, संतोष भीमकरी, सागर कोठारी, अविस सोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिटयाल, सिनु कुरसम, शिवय्या तलांडी, समय्या जनगाम, गणपती जनगाम, रांगय्या गावडे, रागु गावडे, सुकाय्या सिडाम, रमेश साप्पिडी, विनोद पुलसे, श्यामसुंदर गावडे, राजू पिरला, राजु भगत, अशोक जनगामसह जुना सोमनुर गावातील अविसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here