जि.प. माजीअध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मुलचेरा येथे दुर्गामातेच्या पुजेला उपस्थित राहुन घेतले दर्शन

341

The गडविश्व
मुलचेरा, ८ ऑक्टोबर : नवरात्रो उत्सवात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सोमवार ६ ऑक्टोम्बर रोजी मूलचेरा येथील विवेकांनदपूर सार्वजनिक दुर्गा मंडळ येथे नवदुर्गा मातेचे दर्शन घेऊन पूजा अर्चा केले. यावेळी माता चरणी नतमस्तक होऊन जिल्हावासीयांना सुख, शांती व समृद्धि लाभो अशी मनोकामना व्यक्त केली.
यावेळी अहेरी माजी जिल्हा परिषद सदस्य रॉबिन शाहा, नगरपंचायत चे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, अमित येणपरेड्डीवार तसेच मंडळाचे अध्यक्ष मनोज करमकार, उपाध्यक्ष अपूर्व मुजुमदार, सचिव उत्तम शर्मा, कोषाध्यक्ष क्रीष्णा हलदर तसेच प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here