The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : जि.प.उच्च प्राथमिक शाळा जेप्रा येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली .
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी सारपंचा शशिकला झंझाड, प्रमुख अतिथी म्हणून उपसरपंच कुंदा लोनबले,
शा व्य स अध्यक्ष विनोद भांडेकर, उपाध्यक्ष किशोर नरुले , ग्राम पंचायत सदस्य गुणाजी जंबेवार, दिलीप गावतुरे, विनोद चुनारकर, सुवर्णा कोडाप, जास्वंदा निकुरे, कल्पना नरुले, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री ईश्वर बावणे, एकनाथ उईके, खुशाल बोरूले, प्रसाद गुंफलवार, ममिता मेश्राम, माधुरी चलाख , त मु स अध्यक्ष वासुदेव गावतुरे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हासचिव संजय शिंगाडे, फाल्गुन निकुरे, नरेश चुदरी, खुमेश हर्षे, मुख्याध्यापक आशिष बांबोळे, समीर भजे, आशा हर्षे, कुंदा कांबळे उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला मालार्पण करण्यात आले. मान्यवरांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनचरित्रावर माहिती सांगितली.
यावेळी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेतली व गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. नंतर शालेय परिसरातील स्वच्छता करण्यात आली. प्रास्ताविक आशिष बांबोळे , संचालन समीर भजे तर आभार कु आशा हर्षे यांनी केले.
शेवटी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
