जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नागेपल्ली येथील सिमेंट रोडचे उदघाटन

110

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील ग्राम पंचायत नागेपल्ली येथे मिलिंद खोंड यांच्या घरापासून ते शाम राऊत यांच्या घरापर्यत सिमेंट कांक्रेट रोडाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सदर रस्ता बांधकामासाठी अनेक दिवसांपासून जि.प.अध्यक्ष यांच्याकडे या मागणी रेटून धरली होती. सदर मागणीला जि.प.अध्यकक्षांनी जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजुरी देऊन सदर कामाचे उद्घाटन केले आहे.
या उदघाटन सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसभापती सौ.गीताताई चालुरकर, पं.स.सदस्या सौ.योगीता मौहूर्ले, नागेपल्लीचे सरपंच लक्ष्मण कोडापे, उपसरपंच रमेश शानगोंडावार, ग्राम पं.सदस्य फिनिक्स गिद्द, ज्योती ठाकरे, गुलाब सोयाम, अशोक रापेलिवार, विशाल रापेलीवार प्रशांत गोडसेलवार, कार्तिक तोगम प्रकाश दुर्गे, राकेश सड़मेक आदी नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here