जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते व्हॉलिबाल स्पर्धेचे उदघाटन

118

– शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली च्या वतीने स्पर्धेचे आयोजन

The गडविश्व
अहेरी : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.मेळपल्ली अंतर्गत येत असलेल्या वेडमपल्ली येते शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हॉलिबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला, दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी पं .स.सभापती भास्कर तलांडे, ग्रामपंचायत मेळपल्ली चे सरपंच नीलेश वेलादी ,माजी सरपंच पेरमल्ली प्रमोद आत्राम होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटिल लक्ष्मण गावडे, शंकर गावडे, गोंडी भुमक, बापू वेलादी ,शामराव वेलादी, बीचु गावडे, नारायण कुमरे, मेळपल्ली ग्रा.प.सदस्य दिवाकर तलांडे, बापू सुरमवार,दलसु आत्राम उपसरपंच मेळपल्ली, विलास वेलादी ग्रा.प.सदस्य, अविनाश कुमरे, हनमन्तु गावडे, श्रीनिवास गावडे, भगवान सिडाम, विलास वेलादी, राजू वेलादी, सुधाकर वेलादी, शिवराम वेलादी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here