– सचिन क्रीडा मंडळ रामपूर चेक (ओडिगुडम ) च्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व अहेरी : तालुक्यातील रामपूर चेक (ओडिगुडम) येथे सचिन क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय असे तीन पुरस्कार बक्षिस स्वरूपात या स्पर्धेत देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या कु.सुनीताताई कुसनाके होती तर यावेळी मंचावर पंचायत समिती सदस्या सौ.छाया पोरतेट, सरपंचा सौ.मीनाताई वेलादी, उपसरपंच सुरेश गंगाधारीवार, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, वेलगुरचे उपसरपंच उमेश मौहूर्ले, ग्रा.प.सदस्य , सविता कोकीरवार, सामाजिक कार्यकर्ते नितीन गुंडावार होते. यावेळी प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे अध्यक्ष कार्तिक ठाकरे, दिवाकर चाटरे, प्रशांत देवारवार आदि उपस्तीत होते.
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया चा प्रदुभाव लक्षात घेता मलेरिया विषयी व्यापक जनजागृती होणेसाठी आरोग्य विभाग विविध उपक्रम राबवत आहे....