जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लंकाचेन येथील जि.प. शाळेतील नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन

153

The गडविश्व
अहेरी : जिल्हा परिषद् गडचिरोली पंचायत समिती अहेरी अंतर्गत येत असलेल्या लंकाचेन येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण असून विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र या शाळेत वर्गखोलीच्या कमतरता असल्याने विद्यार्थ्याना शिक्षण घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती. जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे नवीन वर्गखोलीच्या बांधकामाची मागणी केली असता जि.प.अध्यक्षांनी सन २०२०-२१ जिल्हा वार्षिक योजना व अंकाक्षीत योजनेच्या निधी मधून नविन वर्ग खोली उपलब्ध करून दिली . आज सदर नवीन वर्ग खोलीचे उद्घाटन जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, आवलमरी ग्राम पंचायतचे सरपंचा सौ.सुनंदा कोडापे, उपसरपंच चिरंजीव चिलवेलवार, ग्राम पंचायत सदस्य, प्रशांत गोडसेलवार आविस शहर अध्यक्ष अहेरी, जगय्या परकीवार, मारोती मडावी, व्येंकना कोडापे, वसंत इष्टम, प्रकाश दुर्गे, इरसाद शेख व गावातील नागरीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here