जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील विद्यार्थ्यांनी घुबडाला दिले जीवनदान

306

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १७ ऑक्टोबर : स्थानिक जिल्हा परिषद हायस्कूलच्या पटांगणात असलेल्या घुबडाला विद्यार्थ्यांनी जीवनदान दिले.
आज १७ ऑक्टोबर ला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील पटांगणावर अचानक घुबड असल्याचे निदर्शनास आले.
विद्यार्थ्यांनी आरडाओरड करताच शिक्षकांचे लक्ष घुबड कडे गेली. सर्व शिक्षक कर्मचारी हे एकत्रित होऊन नुकतेच वन्य जीव सप्ताह साजरा करण्यात आले याची प्रेरणा घेऊन वनविभागाला फोन द्वारे सदर माहिती दिली. माहिती मिळताच वनरक्षक आकाश आलाम यांनी सदर ठिकाण गाठले व सर्व शिक्षक, विद्यार्थ्यांनी घुबडाला त्यांच्या सुपुर्द केले.
यावेळी जि.प.हायस्कुल चे मुख्याध्यापक डी. टी. कोहाडे, प्रशांत साडवे, अशोक कोल्हटकर, संगीता निनावे, बादल वरगंटीवार, विनोद पदा हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here