जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरवाही येथे शालेय बालपंचायत स्थापन

281

The गडविश्व
सावली, १९ जुलै : मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक कु. निकिता ठेंगणे यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन चंद्रपूर व मुल येथील शाळेमधील मूल तालुक्यात “SCALE” कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी “खेळाद्वारे शिक्षण/जीवन कौशल्य विकास” हा उपक्रम मागील वर्षापासून अविरतपणे राबविला जात आहे. उपक्रमाचे विषेश म्हणजे हा उपक्रम शाळेत शिक्षकांच्या सहकार्यने राबविला जात आहे.
विद्यार्थ्यांमध्ये जीवन कौशल्य रुजविणे, माध्यमिक शिक्षण पूर्ण करणे व मुलींचे लग्नाचे वय वाढविणे अशा हेतूने मॅजिक बस संस्था चंद्रपूर जिल्ह्यात काम करीत आहे.१८ जुलै २०२२ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मोरवाही येथे निवडणूक पद्धतीने शालेय बालपंचायत स्थापन करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, प्रचार करणे, प्रत्यक्ष मोबाईल EVM चा मतदान करण्यासाठी वापर करून निवडणूक पार पाडली. निवडणुक झाल्यानंतर निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करुन शपथवीधी घेण्यात आली.शालेय बाल पंचायत निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने मुख्याध्यापक नैताम, पेंदाम,पाऊलकर,चावरे, निकेसर, टोंगे असे सर्व शिक्षकवुंद यांनी मुख्य भुमिका बजावली व निवडणूक यशस्वी केली. बालपंचायत निवडणुकीला शाळा व्यवस्थापन समिती व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे शाळा सहाय्यक अधिकारी दिनेश कामतवार व समुदाय समन्वयक प्रांजली खोब्रागडे यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here