The गडविश्व
सावली, २४ सप्टेंबर : तालुक्यातील पाथरी नगरी परिसरातील मध्यवर्ती ठिकाण असून येथे शिक्षण व्यवस्थे करिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जिल्हा परिषद हायस्कुल, व संत तुकाराम कनिष्ठ महाविद्यालय आहेत. विद्यार्थ्याच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी पंचायत समिती तथा जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन केल्या जाते. सावली येथे २०२१-२२ या वर्षात ४३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन केले असता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरी येथील कुमारी श्रुती हर्षानंद गावन्डे या विद्यार्थीनिने पंचायत विज्ञान प्रदर्शनी मध्ये पंचायत समिती स्तरावर प्रथम क्रमांक पटकविल्या नंतर जिल्हा स्तरावर निवड झाली असता जिल्हा स्तरावर तिने तृतीय क्रमांक पटकवीला आहे व या विद्यार्थीनीची राज्य स्तरावर निवड झाल्याने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरीचे नाव लौकिक केले आहे.
यश संपादन केल्याने पाथरी वासिय ग्रामस्थ यांचे कडून तिचे कौतुक होत आहे. हे यश मिळविण्यासाठी येथील मार्गदर्शक शिक्षक योगेश पवार तथा मुख्याध्यापक वाढई यांनी मार्गदर्शन केले.