जिनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकसच्या जेऊर येथील २५ विद्यार्थ्यांचे समर नॅशनल अबॅकस स्पर्धेत घवघवीत यश

226

The गडविश्व
करमाळा : जिनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटर, जेऊर येथील २५ विद्यार्थ्यांनीं समर नॅशनल स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल सन्मान सोहळा करमाळा येथील यशकल्याणी सेवा भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते. पुढे बोलतांना म्हणले की, मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी गणित विषयाबरोबर मुलांना पुस्तक वाचनाची आवड असणे गरजेचे आहे. पुस्तकांना आपले मित्र बनवून त्यातून नवीन नवीन गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजेत व स्वतःचे वेगळे असे व्यक्तिमत्व बनवले पाहिजे. मुलांना सृजनशील बनवणे काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा.गणेश करे – पाटील हे होते. यावेळी श्रिराज झांजुर्णे , दर्श रणदिवे,आरोही पाटील, अनन्या पाटील, ईशान फकीर, अनुज निर्मळ, आदित्य पाटील या विद्यार्थ्यांनी अबॅकसचे प्रात्यक्षिक सादर केले तर सई नलवडे, स्वरा निर्मळ, पलक बलदोटा, आराध्या वेदपाठक, राजवीर बाबर, वेदांती निमगिरे, ईश्वरी काशीद, शरण्या साळुंके, पाथ्रुडकर शाश्वत या छोट्याश्या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालकांमधून सौ.स्वाती बाबर व वैभव पाथ्रुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यापीठावर चंद्रशेखर शिलवंत (विश्वस्त तज्ञ),अशपाक जमादार (राष्ट्रवादी काँग्रेस युवक – उपाध्यक्ष ), सौ .सुनीता देवी (संचालिका , नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल, करमाळा), सौ .सोनाली शिंदे (संचालिका, लिटिल स्टार अबॅकस अकॅडमी , बार्शी), सभापती सौ.सुनीता निमगिरे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी देखील मुलांना – पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्व मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी , सन्मानपत्र त्याचप्रमाणे यशकल्याणी संस्थेकडून सन्मानपत्र, मेडल देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात प्रा. करे पाटील यांज अबॅकस साठी लागणारी सर्वतोपरी मदत यशकल्याणी संस्था देण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले.
जिनियस प्रोअँक्टिव अबॅकस सेंटर च्या संचालिका कु.अंकिता वेदपाठक यांच्या कार्याबद्दल विशेष आभार मानत कौतुक केले. यावेळी कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.अंकिता वेदपाठक यांनी केले तर आभार विष्णु वेदपाठक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी यशकल्याणी संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here