जामनारा येथे व्यसन उपचार क्लिनिक : १० रुग्णांनी घेतला पूर्ण उपचार

190

The गडविश्व
गडचिरोली : कोरची तालुक्यातील जामनारा येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एकूण १० रुग्णांनी दारूमुक्त होण्यासाठी पूर्ण उपचार घेतला.
दारूचे व्यसन, हा एक आजार आहे, आणि तो उपचाराने बरा होऊ शकतो. दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांना गावातच उपचाराची सोय उपलब्ध व्हावी, या उद्देशाने मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवर क्लिनिकचे आयोजन केल्या जाते. जामनारा येथील रुग्णांची गरज लक्षात घेता मुक्तिपथ गाव संघटनेच्या मागणीनुसार गावात क्लिनिकचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान १० रुग्णांनी पूर्ण उपचार घेऊन दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.
दरम्यान प्राजु गायकवाड यांनी रुग्णांना समुपदेशन केले. दारूची सवय कशी लागते, शरीरावर कोणते दुष्परिणाम दिसतात, धोक्याचे घटक, नियमित औषोधोपचार घेणे आदींची माहिती रुग्णांना दिली. संयोजक प्रभाकर केळझरकर यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेत दारूचे दुष्परिणाम सांगितले. क्लिनिकचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटिका निळा किन्नाके यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर गोटा, सचिव रवि नंदेश्वर, दिपक वैद्य, शालु वालदे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here