जादूटोण्याच्या संशयावरुन जीवे मारण्याचा प्रयत्न : कुटुंबावर हल्ला करून जाळले घर

611

– चौघेजण जखमी
The गडविश्व
यवतमाळ : जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करून घर जाळले यात चौघेजण जखमी झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्हयातून कुटुंबावर हल्ला करण्यात. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावात जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर या कुटुंबाचे घर जाळण्यात आले. या घटनेत चौघे जण जखमी झाले आहेत. त्यापैकी एकजण गंभीर जखमी झाला आहे तर तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर नागपुरातील सीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात विनायक भोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तर त्यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे. गावातीलच काही जणांनी मिळून भोरे यांच्यावर हल्ला करुन घर जाळले. भोरे कुटुंबीय जादूटोणा करत असल्याचा ग्रामस्थांना संशय होता आणि त्या संशयातूनच त्यांनी हे कृत्य केले आहे.
भोरे कुटुंबाचे घर पूर्णत: जळून खाक झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने तरोडा गावातच नाही तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here