The गडविश्व
गडचिरोली : तालुका स्तरावर इयत्ता ११ वी १२ वी विज्ञान शाखेत तसेच सी. ई.टी, नीट, जे.ई.ई. व्दारे व्यावसायीक अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करताना बऱ्याच अडचणी येत असून व बरेचशी अर्जदार त्रृटीयुक्त प्रकरणे सादर करत असल्याने याबाबत तालुका स्तरावरील जात वैधता प्रमाणपत्राबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता महिला महाविद्यालय गडचिरोली येथे करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षण शिबीराचा गडचिरोली, चामोर्शी व धानोरा या तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक, लिपीक तसेच अर्जदार व पालक यांनी लाभ घ्यावा तसेच सन-२०२१-२२ या सत्रात समितीकडे जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव सादर केलेला आहे. परंतु आज पावेतो जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही असे प्रस्ताव त्रृटीमध्ये आहेत. अशा या तीन तालुक्यातील अर्जदारांनी सदर प्रशिक्षण स्थळी सर्व मुळ पुरावे व मानीव दिनांकाचा जात व अधिवास पुराव्यासह उपस्थित राहावे असे आवाहन उपायुक्त दे.ना. धारगावे यांनी केले आहे.
![](https://www.thegdv.com/wp-content/uploads/ADD111-scaled.jpg)