जागतिक महीला दिनानिमीत्य पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून ‘बेबी मडावी महीला मेळावा’ उत्साहात साजरा

251

– जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्रात ‘बेबी मडावी महीला मेळावा’ उत्साहात साजरा

The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये महीला दिनाबाबत जागरूकता निर्माण होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे सा. अहेरी यांचे नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून महीला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज ०८ मार्च रोजी गडचिरोली जिल्हाभरात बेबी मडावी महीला मेळाव्याचे आयोजन पोस्टे/उपपोस्टे/पोमके स्तरावर करण्यात आले. तसेच पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल सा. यांनी व्युटीपार्लर प्रशिक्षण पुर्ण केलेल्या ३५ महीला उमेदवारांना व्यवसाय सुरू करण्याकरीता मोफत ब्युटीपार्लर चेअर व प्रशस्तीपत्र वितरण करून महीला दिन साजरा केला.
सदर बेबी मडावी महीला मेळाव्यात पोस्टे हद्दीतील कर्तबगार, विविध क्षेत्रातील यशस्वी महीलांचा सत्कार, मेळाव्यास उपस्थित महिलांची मोफत वैद्यकीय तपासणी, हस्तकला प्रदर्शनी, लैंगिक शिक्षण, कुपोषण, शैक्षणिक क्षेत्रातील संधी या विषयावर तज्ञांचे व्याख्यान, शालेय विद्यार्थ्यांकरीता वाद-विवाद स्पर्धा, स्वयंस्फुर्त भाषण, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादिंचे आयोजन करण्यात आले होते. तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, बाल संगोपन योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, दिव्यांगाकरीता एस. टी. बस प्रवास सवलत योजना, श्रावण बाळ योजना, बँक खाते उघडून देणे ईत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच ब्युटीपार्लर, लेडीज टेलर, लोणचा फास्ट फुड, भाजीपाला, हास्पीटॅलिटी, नर्सिंग, आटोमोबाईल, ईलेक्ट्रीकल जनरल ड्युटी असिस्टंट, व्ही. एल.ई (V.LE), गोपनिय बातमीदारांसाठी बक्षीस योजना इत्यादींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे व्हिडीओ तसेच फोटो दाखवून माहीती देण्यात आली.
स्पर्धेतील सहभागी महीला व शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. व्यावसायीक प्रशिक्षणाकरीता ईच्छुक युवक-युवतींची नोंदणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. यांनी महीला दिनानिमीत्य सर्वांना शुभेच्छा दिल्या असुन, याकरीता अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here