जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे महिलांचा सत्कार

99

The गडविश्व
लासलगाव : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या च्या पहिल्या महिला सभापती सुवर्णा ताई जगताप यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये महिलांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला व महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांनी कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांना प्रत्यक्ष भेटून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गेल्या पंधरा दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रात विविध उपक्रम घेऊन महिलांचा सन्मान करण्यात आला व या सन्मानासाठी राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, राष्ट्रीय सचिव रमेश देसाई व महाराष्ट्र प्रदेश उपसचिव सोमनाथ मानकर व इतर पदाधिकारी यांच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये निफाड तालुक्यातील पदाधिकारी यांनी सुद्धा स्त्री शक्तीचा मानसन्मान योग्य रितीने व्हावा याकरता लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सुवर्णा ताई ज्ञानेश्वर जगताप, संगीताताई गुंजाळ जय जनार्दन अनाथ आश्रम लासलगाव, वैदू समाज महाराष्ट्रचे प्रदेश सचिव ज्योती ताई शिंदे, ब्राह्मण महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष स्मिता शेखर कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम, राष्ट्रीय सचिव रमेश देसाई , प्रदेशाध्यक्ष वैभव पाटील, यांच्या वतीने या महिलांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार, युवा सेना राज्य सहसचिव मनीषा वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोडे, संगमनेरच्या प्रथम नगराध्यक्षा दुर्गाताई सुधीर तांबे, निफाडच्या उप विभागीय दंडाधिकारी अर्चना शिवाजीराव पगारे, आमदार सरोजताई अहिरे, दिंडोरी नगरपंचायतच्या नगरसेविका शैलाताई सुनील उपाडे, आमदार सीमा महेश हिरे अशा अनेक महिला मान्यवरांचे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here