The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय द्वारे विविध कायदे, अधिनियम या विषय मार्गदर्शन व जनहित ग्रामीण विकास बहुउदेशीय संस्था येणापूर यांच्या वतीने कलापथक च्या माध्यमातुन पथनाट्य कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेले बाल कल्याण समितीचे अधक्षा श्रीमती सविता सादमवार मॅडम,. तसेच प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित तेजस्विनी देशमुख पोलीस उपनिरीक्षक गडचिरोली,तसेच कोटुंबिक हिंसाचार पासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 या विषयावर मार्गदर्शक म्हणून रुपाली काळे संरक्षण अधिकारी,तसेच कामाच्या ठीकानी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियम 2013 या विषयावर मार्गदर्शक म्हणून सारिका वंजारी विधी सल्लागार ,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दिपक ऊके सर लेखाधिकारी, उपस्थित होते.
बाल कल्याण समितीचे अधक्षा श्रीमती सविता सादमवार मॅडम, ,महिलांनी आजच्या आधुनिक युगात स्वतापासून बदल केले पाहिजे.उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी सुध्दा महिला कायदया बद्दल आपआपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अविनाश गुरनुले जिल्हा बाल संरक्षण अधिकारी गडचिरोली,बाल संरक्षण अधिकारी कवेश्र्वर लेनगुरे,पुरुषोत्तम मुजुमदार,विलास ढोरे,जयंत जथाडे,निलेश देशमुख,पूजा धमाले,मनीषा पुप्पालवार,तसेच वन स्टॉप सेंटरचे अतुल कुनघाडकर व प्रशासकीय भवन बॅरेक क्रं. 1 आणि 2 मधील महिला अधिकारी व कर्मचारी,सर्व कार्यालयातील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन प्रियंका आसुटकर बाल संरक्षण अधिकारी यांनी केले तर आभार रवींद्र बंडावार क्षेत्र कार्यकर्ता यांनी मानले.