जनसुविधा अंतर्गत कामांना मंजुरी द्या

261

– अ.भा.स.प.म.रा चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तथा ग्रा.पं.मानेमोहाळी सरपंच राजेंद्र कराळे यांची निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / चिमूर, १० नोव्हेंबर : आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये जन सुविधा अंतर्गत स्मशानभूमी, ग्रामपंचायत व अंगणवाडी कामांना मंजुरी देण्याची मागणी अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत मानेमोहाळीचे सरपंच राजेंद्र कराळे यांनी निवेदनातून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
जन सुविधा योजनेतील कामे मंजूर करताना राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, ज्या गावांना खरंच गरज आहे त्या गावांना निधी मिळत नाही व वरिष्ठ नेत्यांशी ज्यांचे संबंध आहेत त्यांनाच निधी प्राप्त होत आहेत असा अनेक सरपंचांचा कयास आहे त्यामुळे जिल्हा नियोजन समितीमार्फत जन सुविधा योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेकडून प्राप्त होणारा विविध प्रस्तावांपैकी स्मशानभूमीचे काम, ग्रामपंचायत भवन बांधकाम व अंगणवाडी केंद्र बांधकाम या बांधकामांना योग्य अग्रक्रम देऊन या कामांसाठी जन सुविधा निधी उपलब्ध करून जिल्ह्यातील अनेक गावांना न्याय द्यावा अशी मागणी सरपंच राजेंद्र कराडे यांनी केली आहे.

– कामांवरील स्थगिती उठवा

महाराष्ट्र शासनाने अनेक कामांना स्थगिती दिलेली आहे। त्यात जन सुविधा योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे सुद्धा आहेत. जन सुविधा योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये अनेक कामे मंजूर झाली होती. त्यापैकी बरेचसे कामे पूर्ण झाली आहेत किंवा निविदा प्रक्रिया होऊन पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. स्थगिती पूर्वी ज्या कामांची निविदा प्रक्रिया झालेली नव्हती किंवा कार्यारंभ आदेश दिलेले नव्हता ती कामे स्थगितीमुळे अजूनही सुरू झालेली नाही यासाठी आपल्या स्तरावरून पाठपुरावा करून कामांना असलेली स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून अखिल भारतीय सरपंच परिषद चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष तथा ग्रामपंचायत मानेमोहाळीचे सरपंच राजेंद्र कराळे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here