जनसामान्यांशी नाळ जुळवून असलेला, जनतेचा नेता : अजय कंकडालवार

403

वाढदिवस विशेष

अजय कंकडालवार, हे नाव गडचिरोली जिल्ह्यातील सामान्य नागरिकांपासून ते राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सुपरीचीत आहे.
अहेरी तालुक्यातील इंदाराम या छोटयाश्या गावातून आपली राजकीय कारकीर्द सुरू करून सामान्य कार्यकर्ता, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, बाजार समितीचे संचालक, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष, राज्यस्तरीय पुरस्कारापर्यंत मारलेली मजल, जनसामान्यांसाठी धावून येणारा नेता ही त्यांची ओळख.
अजय कंकडालवार यांनी आपल्या राज्यकीय कारकिर्दीत अनेक विकास कामे खेचून आणले आहेत. लाॅकडाऊन काळात अनेकांना मदतीचा हात पुरवला, त्यांनी लाॅकडाऊन काळात दुसऱ्या राज्यात गेलेल्या मजुरांना आपल्या राज्यात येण्याची सोय सोबतच त्यांचा राहण्याची, जेवनाची सोय करून दिली. एवढेच नाही तर अनेकांना मदतीचा हात देवून आर्थीक मदत पोहचवली आहे त्यामुळे जनसामान्यांशी नाळ जुळवून असलेला, जनतेचा नेता असेही त्यांच्याकडे बघितले जाते.
सामाजिक कार्य करीत असताना अजयभाऊ कंकडालवार यांना राजकारणाचा योगायोग माजी आमदार दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून मिळाला. आदिवासी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून अत्यंत तळागाळातील प्रश्न सोडविणे, अडलेल्यांची कामे पूर्णत्वास नेणे, गरजू, गरीबांना विविध योजनांचा लाभ मिळवून देणे यामुळे अजयभाऊ प्रत्येकाच्या मना – मनात पोहचले.
निवडणुका जवळ आले आणि निवडुन आले म्हणूनच नाही तर निवडणुका असो अथवा नसो सदैव जनतेशी एकनिष्ठ व संपर्कात राहून मदत करीत असतात.
जिल्हयातील प्रत्येक निकडणुकीत त्यांचा सक्रीय सहभाग असतोच. त्याचप्रमाणे अनेक कार्यक्रमाला आदराने दिलेल्या आमंत्रणाला स्विकारून कार्यक्रमात आपली उपस्थिती दर्शवित असतात. जिल्हयातील दुर्गम भागात मेळाव्याचे आयोजन करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, तसेच परिसरातील संपुर्ण बाबींचा आढावा घेऊन समस्या दुर करून तेथील जनतेशी त्यांच्या भाषेतच संवाद साधून समस्या सोडविणे, अपघातग्रस्तांना, आर्थिक अडचणीत असलेल्यांना आर्थीक मदत पुरविणे, मृतकाच्या घरी सांत्वना भेट देवून आर्थीक मदत करणे, कार्यकर्त्यांशी कोणताही दुजाभाव न करता मनमोकळेपणाने संवाद साधने, नागरिकांच्या समस्या परस्पर जाणून घेणारा एकमेव नेता म्हणूनही त्यांच्याकडे बघीतले जाते.
अजय कंकडलवार यांनी जिल्हयातील दुर्गम अतिदुर्गम भागाचे दौरे करून नागरिकांच्या समस्या सोडविल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हयाचा सर्वांगिन विकास हाच ध्यास घेवून आरोग्य,शिक्षण, कृषी, बांधकाम अशा सर्वच क्षेत्रात जातीने लक्ष देवून जिल्हयाच्या विकासासाठी झटणाऱ्या अशा नेत्याची जिल्हयाला आवश्यकता आहे.
अध्यक्ष पदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात विविध विषयांवर सभागृहात सर्वांना सोबत घेवुन केलेले नियोजन व त्याची उकल, दुर्गम भागात राहून केलेली विकासकामे , सामाजिक उपक्रम या सर्व बाबी विचारात घेऊन नुकताच मार्च २०२२ मध्ये राज्यात स्थापन झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशन चा राज्यस्तरीय उत्कृष्ट जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून अजय कंकडालवार यांना केंद्रीय पंचायतराज मंत्री मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. असा पुरस्कार मिळणारे जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद अध्यक्ष ठरले.
सध्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद नसतांनाही विविध विकास कामास हातभार, नागरिकांच्या संपर्कात राहून समस्या जाणून घेत आहे हे मात्र विशेष.
जिल्ह्यातील नगरपंचायतीवर आविस च्या अधिक जागा निवडून येण्यास मोलाचा वाटा आहे.
पुढील जिल्हा परिषद निवडणुकीत निवडुन येणे निश्चीत असून यावेळी आविस ची एकहाती सत्ता यांच्या नेतृत्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाहीे. अशा जनसामान्यांच्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप – खूप शुभेच्छा!

‘ The गडविश्व’ न्यूज तर्फे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here