जखमी अवस्थेत असलेल्या अपघातग्रस्ताला टायगर ग्रुपने केली मदत

253

– आलापल्ली-भामरागड मार्गावर झाला अपघात
The गडविश्व
अहेरी : आलापल्ली-भामरागड मार्गावर अपघातात जखमी झालेल्या इसमास आलापल्ली टायगर ग्रुप ने मदत करत अहेरी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरीता गडचिरोली जिल्हा सामान्य रुगणालायत दाखल केले.
बाबुराव झोडे हे आरेंदा येथून काही कामानिमित्त १७ एप्रिल रोजी रात्रोच्या सुमारास आपल्या दुचाकीने आलापल्ली येत असतांना आलापल्ली पासून २० किमी अंतरावर भामरागड रोडला कासपल्ली येथे दुचाकीचा तोल गेल्याने दुचाकीची एक झाडाला धडक बसली यात बाबुराव झोडे हे जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत पडून होते. दरम्यान या वेळी त्या मार्गाने जाणाऱ्या मजुरांनी त्याच्याजवळ पाहणी केली व जाणार येणाऱ्या वाहनांना थांबवून मदत मागण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही मदत केली नाही. शेवटी सदर बाब टायगर ग्रुप च्या सदस्यांना कळताच टायगर गृओचे सचिव आदर्श केशनवार व कोषाध्यक्ष सागर रामगोनवार व रक्तसेवक कुणाल वर्धलवार यांनी टायगर ग्रुपच्या रुग्णवाहिकेने मदत पोहचवून अहेरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचाराकरिता त्याच रुग्णवाहिकेने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here