चिमूर : अखेर त्या अस्वलीला जेरबंद करण्यास वनविभागाला यश

181

The गडविश्व
चिमूर : तालुक्यातील वाघेडा – विहिरगाव मार्गावरील अशोक रामटेके यांच्या शेतात अस्वल आपल्या दोन पिलांसह कालपासून ठान मांडून बसली होती. अस्वलीला बघण्यास परिसरातील बघ्यांची गर्दी सुद्धा उसळली होती. याबाबत वनविभागाला माहिती होताच वनविभागाच्या रेस्क्यू टीमने आज दुपारच्या सुमारास अस्वलीला जेरबंद केले आहे.
ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नजीक असल्याने जंगलातील प्राणी गावाकडे खाद्याच्या शोधात भटकत आहे. परीसरातील नागरिकांना हे नित्यानेमाचेच झाले आहे. परंतु काल वाघेडा-विहिरगाव मार्गवरील शेतशिवारात अस्वल आपल्या दोन पिलांसह आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत विडिओ सर्वत्र सोशल मीडियावर वायरल झाले होते. या दरम्यान अनेकांनी अस्वलीला बघण्यास हजेरी सुद्धा लावली होती. आज पुन्हा सदर अस्वल त्याच ठिकाणी ठान मांडून होते. नागरिक त्याच परिसरातून ये जा करीत होते मात्र ति कुठलेही हालचाल करीत नसल्याचे दिसून आले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली असता त्या ठिकाणी बचाव पथकाद्वारे १ वाजतापासून बचावकार्याला सुरवात करण्यात आली. अखेर एक तासांनी अस्वलीला जेरबंद करण्यास वनविभागला यश आले आहे. अस्वलीला जेरबंद केल्याने परिसरातील नागरिकांनी वनविभागाचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here