चालू वर्षातील उत्सवांच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याच्या परवानगीची नियमावली जारी

154

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या आदेशानुसार चालू आर्थिक वर्षात सन 2022 अनुषंगाने एक दिवस निश्चित करुन सण, उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगी सकाळी 6 वा. ते रात्रो 12 वाजेेपावेतो निर्धारित करुन आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याच्या परवानगी

19 फेब्रुवारी 2022 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती
14 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
01 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिन
गणपती उत्सव 3 दिवस, (गौरी विसर्जन, सातवा व अनंत चतुर्थदशी),
नवरात्री उत्सव 2 दिवस (अष्टमी व नवमी)
05 ऑक्टोबर 2022 रोजी विजयादशमी
09 ऑक्टोबर 2022 रोजी ईद-ए-मिलाद
लक्ष्मीपूजन 24 ऑक्टोबर 2022 रोजी दिवाळी
25 डिसेंबर 2022 रोजी ख्रिसमस
31 डिसेंबर 2022 रोजी 31 डिसेंबर

याप्रमाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी सन 2022 या वर्षामध्ये वरीलप्रमाणे 13 दिवस ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींचा वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून या आदेशाद्वारे करीत आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरण यांचे तंतोतंत पालन करावे. जनहित याचिका क्र.173/2010 मध्ये मा. उच्च न्यायालयाने 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यात यावे. अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतूदींचे उल्लंघन होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्या. ही सुट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. कोविड-19 चे अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियमावली मधील अटी व शर्ती लागू राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय मीणा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here