चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय : ८ सीट चारचाकी वाहनांमध्ये ६ एअरबॅग अनिवार्य

136

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा

The गडविश्व
नवी दिल्ली : चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्याची घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे. एअरबॅग अनिवार्य करण्याला मंजुरी मिळाल्याचे केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
आपल्या ट्वीटमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, ‘आठ आसनी चारचाकी वाहनांमध्ये प्रवास करणाऱ्यांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता या चारचाकी वाहनांमध्ये किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात आल्या आहेत. हा मसुदा GSR अधिसूचना मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने याआधीच एक जुलै 2019 पासून चालक एअरबॅग आणि 01 जानेवारी 2022 पासून चालकासमोरील सह-प्रवासी एअरबॅगच्या फिटिंगची अंमलबजावणी अनिवार्य केली होती.’
चारचाकी गाडींमध्ये पुढील आणि मागील दोन्ही कंपार्टमेंटमध्ये बसलेल्या प्रवाशांना टक्करांचा प्रभाव कमी करण्यासाठी, M1 वाहन श्रेणी म्हणजेच आठ आसनी वाहनामध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील वाहनांना पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. एअरबॅग नियमांमुळे प्रवाशांची सुरक्षितता अधिक चांगली होईलस असेही गडकरी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here