चामोर्शी : आरोग्य सेवक अडकला एसीबीच्या जाळ्यात

2068

– ३ हजार ५०० रूपयांची स्विकारली लाच
The गडविश्व
गडचिरोली, २ ऑगस्ट : कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून देण्याच्या कामाकरिता ४ हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार ५०० रूपयांची लाच स्विकारतांना चामोर्शी पंचायत समिती येथील आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार (४७) यांला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाईमुळे पंचायत समिती विभागात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांच्याकडे कोतवाल पंजी प्रमाणपत्र बनवून मागीतले असता आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांनी सदर काम करून देण्यासाठी ४ हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी केली मात्र तक्रादार यांना सदर लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे शहानिशा करून सापळा रचला असता आज २ ऑगस्ट रोजी आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांना पंचायत समिती चामोर्शी येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३ हजार ५०० रूपयांची लाच रक्कम स्विकारतांना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी लाचखोर आरोग्य सेवक रामचंद्र मार्कंडी पाटेवार यांच्या विरोधात पोलीस स्टेशन चामोर्शी येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, पोलीस उपअधिक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनात पोनि श्रीधर भासेले, सफौ प्रमोद ढोरे, नापोशि किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, संदिप घोरमोडे, संदिप उडाण, मपोशि विद्या म्हशाखेत्री व चापोहवा तुळशिराम नवघरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here