चंद्रपूर : १ लाख रुपयांची लाच स्विकारतांना वनपाल एसीबीच्या जाळ्यात

905

– वनविभागात खळबळ

The गडविश्व
ता.प्र /सावली : शेतातील कटींग केलेले सागवान लाकुड वाहतुक करण्याकरिता लागणारा निर्गत परवाणा (TP) देण्याच्या कामाकरिता १ लाख रूपयांची लाच रक्कम स्विकारतांना सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल वासुदेव लहानु कोडापे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदर कारवाईमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे. सदर कारवाई काल ३ जून रोजी करण्यार आली.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांनी गावातील शेतकरी यांच्या शेतातील कटींग केलेले सागवान लाकुड वाहतुक करण्याकरीता लागणारा ठेकेदारिकरीता निर्गत परवाना (TP) देण्याच्या कामाकरीता उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल कोडापे यांच्याकडे मागणी केली. वनपाल यांनी निर्गत परवाना देण्याच्या कामाकरीता १ लाख २ हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची कोणतीही इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली असता तक्रारीची शहानिशा करून काल ३ जून रोजी सापळा रचुन कार्यवाही दरम्यान उपक्षेत्र पाथरी येथील वनपाल वासुदेव कोडापे यांनी तक्रारदाराकडे १ लाख २ हजार रूपयांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती १ लाख रूपयांची लाच स्वत: स्विकारल्याने त्यांच्या शासकिय निवासस्थानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
सदर कार्यवाही पोलीस उपायुक्त तथा पोलीस अधिक्षक लाप्रवि नागपूरचे राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक मधुकर गिते, तसेच उपअधिक्षक लाप्रवि चंद्रपूर अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शिल्पा भरडे तसेच कार्यालयीन स्टॉफ सफौ रमेश दुपारे, नापोकॉ नरेश नन्नावरे, पो.अ. रविकुमार ढेंगळे, वैभव गाडगे व चालक सतिश सिडाम यांनी केली.
कोणीही लाचखोर अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम लाचेची मागणी करीत असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here