चंद्रपूर येथील पत्रकार प्रकाश हांडे यांना चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार

259

The गडविश्व
चंद्रपूर : अप्रतिम मीडिया’ च्यावतीने बीट जर्नालिझमसाठी दिला जाणाऱ्या ‘ चौथास्तंभ विशेष पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली असून यात चंद्रपूर शहरातील न्यूज 34 या न्यूज पोर्टल चे संपादक प्रकाश हांडे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
संपूर्ण राज्यातून विविध माध्यम प्रकारांच्या प्रतिनिधींनी नामांकन केले होते. २०२०- २०२१ या दोन वर्षांमध्ये संबंधित पत्रकाराने केलेले विशेष वृत्तांकन , विश्लेषण व पुरस्कार निवड प्रक्रियेचा भाग म्हणून वेब संवादाद्वारे एखाद्या समस्येची केलेली मांडणी इत्यादी निकष लावण्यात आले होते . त्यानुसार राजकारण ते पर्यावरण वृत्त गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अशा श्रेणीचे पुरस्कार घोषित करण्यात येत आहेत , अशी माहिती अप्रतिम मीडियाचे संचालक डॉ . अनिल फळे , संचालिका सौ . प्रीतम फळे , निमंत्रक सर्वश्री राहुल शिंगवी , रणजीत कक्कड , मानस ठाकूर , जगदीश माने , निशांत फळे यांनी दिली.
चंद्रपूर शहरातील पत्रकार प्रकाश हांडे यांना राजकीय बातमीच्या श्रेणीतून पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. मुंबई येथे लवकरच होणाऱ्या भव्य वितरण समारंभात सन्मानित करण्यात येईल.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चंद्रपूर शहरातील पत्रकारिता, सामाजिक, आणि राजकीय क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here