चंद्रपूर : चोरांनी थेट खासदारांचा बंगला फोडला , साहित्यांची केली नासधूस

1430

– तिघांना अटक
The गडविश्व
चंद्रपूर : चोरांनी थेट खासदारांचा बांगला फोडणी चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल २७ एप्रिल रोज्जी चंद्रपूर येथून उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी १२ तासात तिघांना अटक केली आहे. रोहित इमलकर (२४), शंकर नेवारे (२०) दोघेही रा. दुर्गापूर, तन्वीर बेग (२०) भंगाराम वार्ड चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, खासदार बाळू धानोरकर यांचा सरकार नगर येथे सूर्यकिरण नावाचा बंगला आहे. मंगळवारी रात्री ते वरोऱ्याला होते. सुरक्षरक्षक व त्याची पत्नी गाढ झोपेत होते दरम्यान चोरटयांनी हीच संधी साधून बंगल्याच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला व त्यानंतर मुख्य प्रवेश दाराचे कुलूप फोडून आत प्रवेश केला मात्र त्याना काहीही हाती लागले नाही त्यामुळे संतापलेल्या चोरांनी सामानाची नासधूस करत कपाटहि फोडले. सकाळच्या सुमारास सदर घटना उघडकीस आली असता घटनेची माहिती खासदार धानोरकर यांना देण्यात आली. व चौकीदाराने तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली असता पोलिसांचा फौजफाटा बंगल्यावर दाखल झाला होता. बंगल्यातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता तीन युवक कुलुप ताडून आत प्रवेश करतांना आढळून आले. पोलीसांनी शोधमोहीम राबविली असता अवघ्या १२ तासाच्या आत पोलीसांनी तिघांना अटक केली. थेट खासादराच्या घरात चोर शिरल्याने सामान्यांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here