महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)
– ग्रामसभा घोटपाळी यांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
The गडविश्व
भामरागड, ३ नोव्हेंबर : तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.पं.परायणार अंतर्गत ग्रामसभा घोटपाळी यांच्या वतीने भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.
सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला व दूसरा असे पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष मनोज पुसू वड्डे, उपाध्यक्ष दोघे पल्लो, कोषाध्यक्ष रामजी वड्डे, सचिव सुधाकर मिच्छा, क्रीडा प्रमुख राजेश पुंगाटी होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लालसू आत्राम माजी पंचायत समिती सभापती भामरागड, विष्णू मडावी उपाध्यक्ष न.प.भामरागड, तपेश हलदर, लक्ष्मीकांत बोगामी, शामराव पेपकवार, सुधाकर कोरेत माजी सरपंच, श्रीकांत बंडमवार, महेश परपा, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच, राकेश सडमेक तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.


