ग्राम बाल संरक्षण समिती सदस्यांची प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

166

The गडविश्व
गडचिरोली, १९ सप्टेंबर : जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा महिला बाल विकास कार्यालय गडचिरोली व Miracal foundation Pune यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील काही गावातील VCPC ची निवड करून ग्राम बाल संरक्षण समिती मधील सर्व सदस्यांना, प्रशिक्षित करून कार्यान्वित करण्याकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
Miracal foundation Pune च्या प्रीती डोईफोडे यांनी बालविवाह, भिक्षेकरी, बाल लैंगिक शोषण, हंगामी कामासाठी पालकांसोबत बालकांचे होणारे स्थलांतर, याविषय मार्गदर्शन करून ग्रामीण भागातील आपल्या गावातील बालकांच्या समस्या, समस्याची कारणे व उपाय योजना कशाप्रकारे करायचं याविषयक उपस्थित प्रशिक्षणार्थी कडून माहिती जाणून घेतली.
सदर प्रशिक्षण कार्यशाळाचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. प्रशिक्षनाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून Miracal foundation Pune प्रोजेक्ट मॅनेजर प्रीती डोईफोडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थिती बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर, सामाजिक कार्यकर्ते तथा मास्टर ट्रेनर जयंत जथाडे, संरक्षण अधिकारी पुरुषोत्तम मेश्राम, क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार होते. तसेच सदर प्रशिक्षणाला सरपंच, अंगणवाडी सेविका,पोलीस पाटील,आशा वर्कर, विद्यार्थी प्रतिनिधी, बचत गट महिला,एनजीओ प्रतिनिधी यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here