– मुखडी व रामगड येथे शिबीर
The गडविश्व
गडचिरोली २ जुलै : मुलचेरा तालुक्यातील मुखडी व कुरखेडा तालुक्यातील रामगड या ग्रामीण भागात आयोजित शिबिराच्या माध्यमातून एकूण ३३ रुग्णांवर उपचार करण्यात आला. सोबतच समुपदेशन सुद्धा करण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात दारूच्या व्यसनाचे प्रमाण वाढत असून अनेकांना उपचाराची गरज आहे. यासाठी मुक्तिपथ अभियानातर्फे गाव पातळीवर व्यसन उपचार शिबिरांचे आयोजन केले जाते. आतापर्यंत अनेक रुग्णांना या उपक्रमाचा लाभ झाला आहे. मुखडी येथे गावसंघटनेच्या मागणीनुसार आयोजित शिबिरात एकूण १७ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. रुग्णांना प्रमोद कोटांगले यांनी समुपदेशन केले तर संयोजक छत्रपती घवघवे यांनी रुग्णांची केस हिष्ट्री घेतली. शिबिराचे नियोजन तालुका संघटक रुपेश अंबादे यांनी केले. यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य गणेश तलांडे, पोलिस पाटील किशोर मडावी, मुक्तिपथ संघटना अध्यक्ष शामकला मडावी, आशा वर्कर रेखा तलांडे, अंगणवाडी सेविका कविता मडावी यांनी सहकार्य केले.
कुरखेडा तालुक्यातील रामगड येथील शिबिराला रुग्णांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. एकूण १६ रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला. यावेळी समुपदेशक प्राजु गायकवाड यांनी रुग्णांना धोक्याचे घटक, दारूचे दुष्परिणाम समजावून सांगितले. केस हिष्ट्री प्रभाकर केळझरकर यांनी घेतली. रुग्णांची नोंदणी प्रेरक विनोद पांडे तर नियोजन संघटक मयूर राऊत यांनी केले. यशस्वीतेसाठी रामगडचे सरपंच मोरेश्वर मडावी, ग्रामसेवक अनुसया तुमलाम, ग्रापं सदस्य प्रल्हाद नैताम, रामगडचे पोलीस पाटील माधुरी बोरकर, जामटोलाचे पोलीस पाटील रेखा दखणे, वागदराचे पोलीस पाटील मंगला दखणे, अंगणवाडी सेविका भारती बोरसरे, शालिनी मेश्राम, ज्ञानेश्वरी दखणे यांच्यासह गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.