The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १ ऑगस्ट : तालुक्यातील रांगी ग्रामपंचायत चे सचिव पी. एस.बुराडे यांचा आज १ ऑगस्ट ला वाढदिवस होता. याच वाढदिवसाचे औचित्य साधत बुरांडे यांनी रांगी येथिल गरजु महीलांना ग्रामपंचायत भवनात वस्त्र दान करुण अनोख्या पध्दतीने स्वताचा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे इतरांनी त्यांचा आदर्श घेण्यासारखे आहे.
ग्रामसेवक पि. एस. बुराडे ग्रामसेवक यांचा ५१ वा वाढदिवस होता. या वाढदिवसाला येथिल सरपंचा सौ.फालेश्वरी प्रदिप गेडाम, उपसरपंच नुरज हलामी, भाजपा तालुका अध्यक्ष तथा ग्राम.पंचायत सदस्य शशिकांत साळवे, ग्रा.प.सदस्य दिनेश चापले यांच्या हस्ते गावातील गरजु महीलाना वस्त्र दान करण्यात आले. जानकुबाई बैजू मडावी, कणकाय दुर्गु तोफा, श्यामलता परसराम चापले, आहिल्या बाई गुंडरे, लक्ष्मण शेडमाके, कौशल्या शेडमाके, सोमीनाबाई धोडरे यांना वस्त्र दान करण्यात आले.
यावेळी सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्राम पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
