ग्रामपंचायत मौशिखांब येथे नागरिकांना वाटप केले दाखले

205

The गडविश्व
अमिर्झा, २३ सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय मौशिखांब येथे २२ सप्टेंबर रोजी नागरिकांना विविध प्रकारच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.
१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधी दरम्यान सेवा पंधरवाडा चे आयोजन करण्यात आले आहे.
मौशीखांब येथील गरमपंचायत मध्ये रहिवासी १०, दारिद्रय रेषेखालील १५, विवाह नोंद नसल्याबाबत ०१, नमुना ८ अ ०५ , जन्म दाखला ०१, मृत्यू दाखला ०२.इत्यादी दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
यावेळू उपसरपंचा सौ.रुपाली एच. गांधरवार, ग्रा.पं.सदस्य जयकुमार डी. खेडेकर व इतर ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी डी.एम. ठाकरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here