ग्रामपंचायत मोहगाव येथे UNO द्वारा घोषीत आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिनानिमीत्य विशेष ग्रामसभेचे आयोजन

156

The गडविश्व
ता. प्र / धानोरा , १४ सप्टेंबर : आदिवासीची संस्कृती आणी रूढि, प्रथा, ओळख, भाषा, रोजगार, आरोग्य, शिक्षण पाणी इतर सर्व मुद्दे व त्यांचे सामीत्व हक, अधिकार कायम टिकविण्याकरीता संयुक्त राष्ट्र द्वारा १३ सप्टेंबर २००७ ला ”आंतरराष्ट्रीय आदिवासी अधिकार दिवस’ ची घोषणा केली. या अनुषंगाने ग्रामपंचायत मोहगाव ने २९ ऑगस्ट २०२२ ला विशेष ग्रामसभेचे नोटीस काढून १३ सप्टेंबर २०२२ ला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.
मोहगाव ग्रामसभेनी ११ फेब्रुवारी २०२१ च्या ठरावानुसार सविधानाच्या पाचवी अनुसूची अनुछेद २४४(१), उपखंड ५, अनुसूची १३ (३) क, १९ (५) (६) अनुसूची ११ मधील अनु २४३ (छ), अनुछेद१२,३५० (क) व कलम ३५०क , व केंद्रीय पेसा कायदयातील अनू ४च्या ग्रामसभेच्या मार्फतीने पारंपारीक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल स्कूल, मोहगाव ही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला व मा. महामहिम राज्यपाल यांचेसमवेत सर्व स्तरावर त्याचा पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
भारतीय संविधानाच्या अनुछेद ३५० (क) नुसार प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच दिले पाहीजे असा स्पष्ट उल्लेख संविधानात आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणापत्रातील अनुच्छेद १२(१) व १४(१) नुसार आपली आदिवासीची भाषा, लिपी संस्कृती जतन करण्याचा अधिकार UNO ने आदिवासीना दिलेला आहे. तसेच आज ग्रामसभेला सर्वोच्च सभेचा दर्जा संविधानाने दिला आहे. त्यामुळे स्थानीक भाषेत स्थापीत केलेल्या पारंपारीक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल स्कूल मोहगाव ला शासकीय मान्यता देन्यात यावीया अधिकारासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन होते.
समेत अध्यक्षस्थानी लिलाबाई वासुदेव आतला हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गावप्रमुख अंताराम आतला, पुजारी अलसु चैतू पावे, गाव भूम्या सनकू नवलू आतला, केंद्रप्रमुख पेंढरी सु. एस चलाख , पावेटोलाचे मुख्याध्यापक मेश्राम, माहेगाव चे सहायक शिक्षक शिंदे , पेंढरी वनपाल समर्थ, वनरक्षक आत्राम, वनरक्षक सोरते, वनरक्षक लेकामी, कृषी सहायक मोहुर्ले, आशा वर्कर धनाय टेकाम उपस्थित होते.
२२ ऑगस्ट २०२२ रोजी गट शिक्षणाधिकारी पं स धानोरा यांनी ग्रामसभा मार्फत चालवित असलेल्या शाळेला अनधिकृत घोषीत केले असल्याने, ही शाळा अनधिकृत नसुन अधिकृत आहे या बाबत ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाली. ग्रामसभेच्या हक्क आणी अधिकाराचे हनन करून ग्रामसभा मार्फत चालवित असलेला शाळेला अनधिकृत ठरवून शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. करीता भारतीय दंड संहिता १८६० चा कलम १६६ आणी १६६ अ नुसार कार्यवाही करण्याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा करण्यात अणि सोबतच २८ जुन २०२२ रोजी केंद्रीय पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालयाने अधिसुचीत वनसंवर्धन नियम २०२२ रद्द करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच इतर सर्वच विषयावर साधकबाधक चर्चा कण्यात आली.
सभेचे सुत्र संचालन व नियोजन ग्रामविकास अधिकारी मोहगाव जयंत मेश्राम यांनी केले तर आभार मु.अ पावेटोला मन्साराम मेश्राम यांनी मानले. सभेच्या यशस्वीतेकरीता बावसु पावे, देवसाय आतला, दिनेश टेकाय, मनीराम आतला, काशीनाथ आतला, उत्तम आतला, नाजुक आतला योगीता भैसारे, मनोहर आतला, कोदू आतला व इतरांनी सह‌कार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here