गोसीखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात वाढ : नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

3793

– ३३ पैकी ३३ दरवाजे उघडले, चिचडोह बॅरेज सर्वच ३८ गेट उघडलेले, पाण्याचा विसर्ग १९,९४३ क्युमेक्स
The गडविश्व
गडचिरोली, १६ ऑगस्ट :

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाने पाण्याच्या पातडीत वाढ झाल्याने धरणाचे सर्वच दरवाजे २.५० मी. ने उघडलेले असुन काल १५ ऑगस्ट च्या विसर्गापेक्षा अधिक म्हणजेच ५,३९,६४९ क्युसेक्स (१५,२८१) येवढ्या पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर संजय सरोवर धरणाचे १० पैकी ४ गेट उघडलेले असुन विसर्ग २०,०४६ क्युसेक्स (५६७ क्युमेक्स) आहे, चिचडोह बॅरेज चे सर्वच ३८ गेट उघडलेले असुन विसर्ग ७,०४,२८७ क्युसेक्स (१९,९४३ क्युमेक्स) आहे.
गोसीखुर्द धरणाचे पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमणात पाऊस पडत असल्यामुळे वैनगंगा नंदीवरील विसर्ग मोठया प्रमाणात वाढलेला आहें. वैनगंगा नदीतील पूराचे पाणी भंडारा शहरातील ३० % भागात शिरले आहे. तरी आता धरणाचा विसर्ग वाढविणे हा एकमात्र पर्याय उपलब्ध आहे. याकरीता येत्या पुढील काही तासात धरणाचा विसर्ग १८००० क्युमेक्स पर्यंत टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल तरी नदी पात्रात आवागमन करणाऱ्यांनी काळजी घ्यावी व सतर्क रहावे असे असे आवाहन करण्यात आले आहे.
धरणातून पाणी सोडत असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे. अनेक भागात पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली असून अनेक मार्गही बंद झाले आहे. तसेच नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर वडसा, वाघोली व आष्टी या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे.

वर्धा नदी :
उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे १३ पैकी १३ गेट ०.६० मी. ने उघडलेले असुन विसर्ग ४३,८२६ क्युसेक्स (१,२४१ क्युमेक्स) आहे.
निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ पैकी ३१ गेट ०.४० मी. ने उघडलेले असुन विसर्ग ३८,८११ क्युसेक्स (१,०९९ क्युमेक्स) आहे.
बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमुर केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे.

प्राणहिता नदी :
महागांव सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार प्राणहिता नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या वर आहे.

गोदावरी नदी :
श्रीपदा येलमपल्ली प्रकल्पाचे ६२ पैकी २० गेट उघडलेले असुन विसर्ग १,०२,३९१ क्युसेक्स (२,८९९ क्युमेक्स) आहे.
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे ८५ पैकी ८५ गेट उघडलेले असुन विसर्ग ८,०३,३७० क्युसेक्स (२२,७४९ क्युमेक्स) आहे.
कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या जवळ पोहोचलेली आहे.

इंद्रावती नदी :
जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम या सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इंद्रावती नदीची पाणी पातळी धोका पातळीच्या वर आहे.

नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीमुळे व उर्ध्व भागातील धरणांमधून विसर्ग प्रवाहीत करण्यात आल्याने नद्यांची पाणी पातळी वाढलेली आहे, त्यामुळे नदीकाठावरील गावातील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here