गोंडवाना विद्यापीठाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात अभाविप विविध मागण्या घेऊन आक्रमक

165

– मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा
The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : गोंडवाना विद्यापीठाचा आज ११ वा वर्धापन दिन असल्याने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम विद्यापीठाच्या आवारात सुरु होण्याच्या काही वेळेपूर्वीच अभाविप चे कार्यकर्ते विविध मागण्या संदर्भात आक्रमक होऊन कार्यक्रम स्थळी दाखल झाल्याने तारांबळ उडाली होती. यावेळी अभाविप च्या वतीने विविध घोषणा देण्यात आल्या. दरम्यान विद्यापीठाचे कुलसचिव यांनी अभाविपचे निवेदन स्वीकारले.

निवेदनात म्हटले आहे कि, गोंडवाना विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थीना NSS (राष्ट्रीय सेवा योजना) साठी R.D. परेड चा सराव करावा असे सांगण्यात आले होते. अश्यातच विद्यापीठाकडून कुठलेही पत्र न काढता परस्पर विद्यार्थ्यांना २८ तारखेला कोल्हापूरचा R.D परेड करीता पाठविण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी परेडला जाण्यासाठी सराव केला अश्या विद्यार्थ्यांचे कुठलीही प्रात्यक्षिक विद्यापीठाकडून न घेता काही विद्यार्थ्यांना परस्पर कोल्हापुरला पाठविण्यात आले. त्यामुळे सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय असून विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास करण्याचे काम विद्यापीठाने केला आहे त्यामुळे संबंधित कार्यक्रम अधिकारी यांनी खोट्या विद्यार्थ्यांना पाठवले, ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केले त्या अधिकाऱ्यांची चौकशी करून आपण त्या अधिकारावर निलंबनाची कार्यवाही करावी, विद्यापीठातील वसतिगृहातील बाथरूम व शौचालयाची स्वच्छता करण्यात यावी, तीथे पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, वसतीगृहातील खिडक्यांना पडदे लावण्यात यावे,विद्यार्थीनीसाठी सॅनिटरी मशिन लावयात यावी, बाथरूम मधील गिझर सुरू करण्यात यावे, वसतीगृह परिसरात सि.सी.टी.वि.कॅमेरे सुरू करणात यावे, गोंडवाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयीयुक्त व अत्याधुनिक साहित्य असणारे जिमखाना तयार करण्यात यावे, गोंडवाना विद्यापिठात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थांना कला गुण विकसित यावे जनजाती क्षेत्रातील विद्यार्थी हा देशपातळीवर जावा, देशपातळीवर ( गोंडवाना ) विद्यापीठा चे नेतृत्व आपला येथील विद्यार्थ्यांमध्ये करावे. याकरिता विद्यापीठात सुसज असे क्रीडांगण व सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे, या वर्षांपासून बऱ्याचश्या विद्यार्थाना चुकीचे नियम लावून प्रथम वर्षात प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले आहे. प्रात्याक्षिक परिक्षेत नापास असल्याने महाविद्यालयात ‘प्रवेश घेता येणार नाही असे चुकीचे नियम लावून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे काम विद्यापीठ करत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा असे विविध मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
यावेळी जिल्हा संयोजक चेतन कोलते, श्रुती कान्हेकर, हिरालाल नूरती, प्रणय मस्के, संदेश उरकुडे, अभिलाष कुणघाडकर, तुषार चुधरी, मोनाली भगत, काजल शेंडे, प्रांत सहमंत्री राहुल श्यामकुवर, विभाग संघटन मंत्री शक्ती केराम व आदी विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here