गोंडवाना विद्यापीठाच्या सत्र २०२१-२२ च्या उन्हाळी परिक्षेचे वेळापत्रक जाहीर

625

– १ जून पासून परीक्षा

– परीक्षार्थींना ३ तास ४५ मिनिटे मिळणार वेळ
The गडविश्व
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक सत्र २०२१ – २२ मधील उन्हाळी २०२२ ची लेखी परीक्षा १ जून पासून नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. सदर वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे

वेळापत्रक पहा

आजी – माझी सर्व मिळून जवळपास १ लाख ३८ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी लागणाऱ्या प्रश्नपत्रिका प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नपत्रिका डिलिव्हरी पद्धतीने पोहोविण्यात येणार आहे. या संदर्भात गोंडवाना विद्यापीठात विदयापरिषद सदस्यांची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी संबंधित अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकानुसार संबंधित परीक्षार्थींना ३ तास ४५ मिनिटे वेळ देण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका ही डिस्क्रिप्टीव्ह स्वरूपात राहणार असून प्रात्यक्षिक परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here