गोंडवाना विद्यापीठाचे विद्यार्थी करणार ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिरात दोन राज्याचे प्रतिनिधित्व

419

– विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
– बेंगलोर येथे १६ ते २२ मार्च दरम्यान ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिर

The गडविश्व
गडचिरोली : बेंगलोर येथील श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदिक सायन्स येथे युवक कल्याण व खेळ मंत्रालय कर्नाटक व कर्नाटक राज्य राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राजीव गांधी आरोग्य व विज्ञान विद्यापीठ द्वारा ‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबीराचे आयोजन १६ ते २२ मार्च दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिरात गोंडवाना विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला महाराष्ट्र व गोवा या दोन राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे नक्कीच गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
या शिबीरमध्ये भारतातील विविध विद्यापिठातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी होत आहे. या शिबिरात राष्ट्रीय सौधाऱ्य ,पारंपरिक संस्कृती, भारतीय राज्यघटना, जीवन मुल्य आणि भारतीय पारंपरिक खाद्यपदार्थ याबाबत विद्यार्थ्यांना जागरूक करण्यात येते.
महाराष्ट्र व गोवा राज्य तर्फे हरडे महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी आणि रासेयो विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे विभागीय समन्वयक आणि गणतंत्र दिवस परेड शिबिर – २०२२ (आर. डी. परेड २०२२) चे लिडर डॉ.पवन रमेश नाईक यांना संघनायक म्हणून पाठविण्यात आले आहे. त्याच्या सोबत गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नीत महाविद्यालयातुन ५ विद्यार्थिनी व ५ विद्यार्थी यांची निवड झाली आहे. गोंडवाना विद्यापीठ या वर्षी प्रथमच राष्ट्रीय एकात्मता शिबिरात सहभागी झाले आहे हे विशेष
गोंडावना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र- कुलगुरू डॉ . श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. या सर्व प्रक्रियेत विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शाम खंडारे यांचे मोलाचे परिश्रम आहेत.
‘राष्ट्रीय एकात्मता’ शिबिरात  प्रतिक्षा पुरुषोत्तम वासनिक- शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,राजुरा ,निकिता गजानन माणूसमारे- आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा , अर्पिता पुरुषोत्तम थोमरे- आदर्श महाविद्यालय वरोरा , प्रणाली अरुण कापते – केवडरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी , जान्हवी विजय पेडीवार – केवडरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी, शुभम शिवशंकर आमने – सुशिलाबाई रामचंद्र मामीडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली चंद्रपूर, संतोष माडकमी – शांताराम पोटदुखे विधि महाविद्यालय चंद्रपूर , पवन कवडुजी दिघोरे – कला व वाणिज्य महाविद्यालय भीसी, चेतन रमेश लाकडे – आदर्श महाविद्यालय वडसा , तुषार कालिदास रहाटे – मोहीन भाई जव्हेरी, महाविद्यालय देसाईगंज वडसा या विद्यार्थ्यांना आपल्यातले कलागुण दाखवण्याची संधी मिळाली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ व महाविद्यालयाकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here