गोंडवाना विद्यापीठाची नवउद्योजक घडवण्याच्या दिशेने वाटचाल

131

The गडविश्व
गडचिरोली : भारत सरकारच्या कार्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे कलम ८ प्रमंडळाची मान्यता व निगमन प्रमाणपत्र गोंडवाना विद्यापीठाला प्राप्त झालेले आहे. सदर प्रमंडळाच्या उपलब्धतेमुळे विद्यापीठ परिक्षेत्रातील आजच्या पिढीतील युवा विद्यार्थी व स्थानिक नागरिकांना गौण वनउपज, वनऔषधी, कृषी व मत्स्य ,अन्न व खाद्यपदार्थ, ड्रोन सर्वेक्षण , वाहतूक, बांबू अशा विविधांगी क्षेत्रांमध्ये स्टार्टअप्सची नावीन्यपूर्ण उत्पादने व सेवा यांच्या करिता सर्व प्रकारचे पाठबळ लाभणार आहे.
गोंडवाना विद्यापीठाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विभाग व उद्योग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी अंतर्गत वर्ग एक नवसंशोधन केंद्राचा प्रस्ताव नुकताच सादर केलेला होता. विविध विद्यापीठ परिक्षेत्रातील युवा विद्यार्थी व नागरिकांच्या नवसंकल्पना चे प्रसूती करून व्यवसायामध्ये रूपांतरण करण्यासाठी विशिष्ट उद्दिष्ट पुर्ती माध्यम म्हणजेच कलम आठ प्रमंडळ ची गरज असते. या अनुषंगाने गोंडवाना विद्यापीठाचे संचालक, ननवसा प्रा. मनिष उत्तरवार यांच्यातर्फे सदर कलम ८ प्रमंडळ ‘ट्राईबटेक समुदाय उद्योजकता संस्था’ ची नोंदणी संबंधित कार्यवाही घेण्यात आलेली होती.
याकरिता गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचा पुढाकार, अनुभव व प्रगल्भ नेतृत्व तसेच प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे तसेच डॉ.अनिल झेड. चिताडे, प्रभारी कुलसचिव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्यामुळे हे यश संपादन झाले असे मनोगत प्रा. मनिष उत्तरवार संचालक न.ना.व.सा. यांनी त्यांच्या सत्कारा प्रंसगी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here