गुरवळा नजीक भरधाव कार पुलाच्या कठड्याला धडकून उलटली : एक ठार, ४ जण गंभीर जखमी

1743

– गडचिरोली-गुरवळा मार्गावरील घटना
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा मुख्यालयापासून काही अंतरावर असलेल्या गुरवळा येथून गडचिरोली कडे येणारी अनियंत्रित भरधाव चार चाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या पुलावर धडक देत उलटून अपघात झाला या अपघातात युवतीचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह इतर तीन जण जखमी झाल्याची घटना गुरुवारच्या सुमारास घडली. पल्लवी संतोष करंगामी (२३) असे मृत युतीचे नाव असून चालक लंकेश शामराव नारोटे(२५), सुनिता झाडूराम बोगा (२३), सुषमा कमारसाय नरोटे (२८ व बसंती केस अशी अपघातात जखमी असलेल्यांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार शहरातील वनश्री कॉलनीत राहणाऱ्या चार महिला लंकेश नरोटे याच्यासोबत एमएच ३३ एसी ०९६३ क्रमांकाच्या चार चाकी वाहने गुरवळा येथे गेले होते. दरम्यान गुरवळा येथून परत येत असताना वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार गुरवळा- गडचिरोली मार्गावर असलेल्या पुलाला धडकली व वाहन उलटले. या अपघातात पल्लवी करंगामी हीच जागीच मृत्यू झाला तर वाहन चालकासह तिघेजण गंभीर जखमी झाले. तर अपघातात चारचाकी वाहन पूर्णतः क्षतीग्रस्त झाले आहे. या घटनेची माहिती होताच गडचिरोली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमींना पुढील उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here