

– डुडलमध्ये १३ भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स
The गडविश्व
मुंबई : जगभरात आज महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महिला शक्ती आणि महिलांच्या सन्मानासाठी महिला दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. सर्च इंजिन गुगलनेही महिला दिनाचे औचित्य साधून एक विशेष डुडल बनवून महिलांचा खास सन्मान केला आहे. या डुडलमध्ये १३ भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.
गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक केल्यानंतर जगभरातील विविध संस्कृती दिसू लागतात. तसेच त्या संस्कृतीमधील स्त्रीया आपले काम कसे करतात याबाबत माहिती देण्यात आली आहे. या डुडल स्लाइडला सोशल मीडियावर शेअर करण्याचा पर्याय सुद्धा दिला आहे. या प्रेरणादायक व्हिडीओमध्ये जगभरातील प्रतिभावंत महिलांचा एक समूह डिझाईन करण्यात आला आहे.जागतिक महिला दिनानिमित्त एअर इंडियाने हवाई वाहतूक महिलांकडे सोपवून त्यांचा खास सन्मान केला आहे. त्यांना महिला दिनाची खास भेट दिली आहे. आज जागतिक महिला दिनी एअर इंडियातील पायलट महिला १२ आंतरराष्ट्रीय आणि ४० हून अधिक देशांतर्गत विमान उड्डाण करणार आहेत.
खालील लिंक वर क्लिक करून तुम्ही डुडल पाहू शकता
https://www.google.com/?fpdoodle=1&doodle=174788846&hl=mr&gl=in

