गावातील स्वच्छता ही घन कचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून पूर्ण होईल : संजय मीणा

199

– 458 ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव कार्यशाळा संपन्न
The गडविश्व
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती स्वच्छता मोहिमेत भौतिक दृष्ट्या आघाडीवर असून आता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनातून खऱ्या अर्थानं स्वच्छता उभारावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीचे अध्यक्ष संजय मीणा यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता कक्ष जिल्हा परिषद गडचिरोली च्या वतीने जिल्ह्यातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन राबविणाऱ्या सर्व 458 ग्रामपंचायतीचे सरपंच सचिव ग्राम विकास अधिकारी यांची घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे यासाठी शहरातील सुमानंद सभागृह येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीचे अध्यक्ष संजय मीणा तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद साहेब उपस्थित होते. विशेष मार्गदर्शक म्हणून युनिसेफ चे प्रतिनिधी जयंत देशपांडे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बी आर सी सीआरसी अंमलबजावणी संस्थेचे कर्मचारी, गुरुदेव संस्थेचे कर्मचारी ग्रामीण गृह अभियंता, विस्तार अधिकारी पंचायत, गटविकास अधिकारी शाखा अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, रोहयो तांत्रिक पॅनल अधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांनी घरकुलाबाबत तर चेतन हीवज उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत व माणिक चौहान उपमुख्य कार्यकारी रोहयो यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन मध्ये कृती संगम कशाप्रकारे घडवून आणावा यासाठी तर अमित तुरकर कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा यांनी कॅच द रेन व वॉटर हार्वेस्टिंग वर मार्गदर्शन केले. जवळपास 1200 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले. कार्यक्रमाचा समारोप वेळी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उद्बोधन करताना सन 22-23 मध्ये घेण्यात आलेली उद्दिष्टे वेळेच्या पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सर्वांकडून घेऊन 100 मॉडेल ओडीएफ प्लस करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आव्हान केले. कार्यशाळा संपल्यानंतर त्याच ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन 22-23 चे उद्दिष्टे पत्रकारांना सांगण्यात आले व याद्वारे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन सर्व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. आभार मुकेश मोहोर गटविकास अधिकारी गडचरोली यांनी मानले. कार्यक्रमाच्या येशश्वीतेसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे अमित माणूसमारे, नादिया शेख, शैलेश ढवस, प्रशिष कोंडबट्टूवार, प्रफुल मडावी, अमित फुंडे, ललित बिसेन, रवींद्र बुरम यांनी मोलाचे योगदान दिले. कार्य्रक्रमाचे प्रास्ताविक व स्वछता घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन व झालेल्या कामाची माहिती फरेंद्र कुतीरकर प्रकल्प संचालक जल जीवन मिशन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here