गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

621

– तालुक्यातील नेरी येथील घटना
The गडविश्व
चिमूर : तालुक्यातील नेरी येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मेघश्याम विठोबा नन्नावरे (२४) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, तालुका मुख्यालयापासून ८ किमी अंतरावर असलेल्या नेरी येथील येथील गांधी वार्ड क्र,४ मधील युवक मेघश्याम विठोबा नन्नावरे हा पुणे येथे खासगी काम करीत होता. काही दिवसांपूर्वीच मेघशाम हा नेरी येथे आला. आई वडील काही वर्षांपूर्वीच मृत्यू पावल्याने घरी एकटाच होता. दरम्यान काल रात्रोच्या सुमारास मेघशामने आपल्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर घटना आज सकाळच्या सुमारास शेजाऱ्यांना मेघशाम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती पोलीसांना चिमूर पोलिसांना देण्यात आली असता. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून प्रेत ताब्यात घेऊन उत्तरनिय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here