गडचिरोली : २ हजारांची लाच स्विकारतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

621

The गडविश्व
गडचिरोली : शेतजमिनीचे फेरफार करण्याच्या कामाकरिता २ हजार रुपयांची लाच स्विकारतांना चामोर्शी तालुक्यातील दोटूकली साजा क्र.१२ मधील तलाठी नामदेव हरिभाऊ चंदनखेडे (४६) यांना लाप्रवी पथकाने रंगहाथ पकडले आहे. या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार यांच्या भावाच्या नावे खरेदी केलेल्या साजा क्रमांक १२ दोटकुली ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील शेत जमिनीचे फेरफार करावयाचे होते. त्याकरिता येथील तलाठी नामदेव हरिभाऊ चंदनखेडे यांनी ५ हजार रुपयांची मागणी करून यापूर्वी ३ हजार रुपये स्विकारून उर्वरित २ हजर रुपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाप्रवि गडचिरोली येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता आज ११ एप्रिल रोजी तलाठी नामदेव चंदनखेडे हे मागणी केलेल्या ५ हजार रुपयांमधील उर्वरित २ हजार रुपये गैरअर्जदार यांच्या चामोर्शी येथील राहते घरी स्विकारत असतांना लाप्रवी पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचखोर तलाठी नामदेव चंदनखेडे यांच्या विरुद्ध कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये पोलीस ठाणे चामोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई, पोलीस उपधीक्षक सुरेंद्र गरड, सफो प्रमोद ढोरे, पोहवा नथू धोटे, पोना राजेश पद्मगिरवार, श्रीनिवास संगोजी,मपोशी विद्या म्हाशाखत्री, चापोहवा तुळशीराम नवघरे यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here