गडचिरोली : १३ ला जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडत

480

– १५ ते २१ जुलै पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार
The गडविश्व
गडचिरोली, ७ जुलै : जिह्यातील सर्व पंचायत समित्यांसह जिल्हा परिषद क्षेत्रातील आरक्षणाची सोडत १३ जुलै रोजी काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ मधील कलम १२ उपकलम (१), कलम ५८ (१) (अ) प्रमाणे व महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या नियम, १९९६ नुसार अनुक्रमे जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती / जमाती स्त्रियांच्या अरक्षणासह राखून ठेवावयाच्या जागा आणि उर्वरित स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा यात निश्चित केल्या जाणार आहे. त्याकरिता हे हि सोडत काढल्या जाणार आहे. सदर आरक्षण सोडत जिल्हा परिषद व सर्व पंचायत समित्यांमध्ये आयोजित सभे दरम्यान काढण्यात येणार असून रक्षणाचे प्रारूप १५ जुलै रोजी प्रसिद्ध केले जाणार आहे. तर आरक्षणाबाबत जिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार यांच्याकडे १५ ते २१ जुलै २०२२ पर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहे.

सभेचे वेळ आणि ठिकाण

१३ जुलै रोजी जिल्हा परिषद, गडचिरोलीची दु. ३.०० वा. जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोलीचे परिसरातील जिल्हा नियोजन समितीच्या नविन सभागृहात.
कोरची पंचायत समिती – स ११.०० वा. पंचायत समिती, सभागृह कोरची.
कुरखेडा पंचायत समिती – दु. ३.०० वा. तहसिल कार्यालय सभागृह, कुरखेडा.
देसाईगंज पंचायत समिती – स. ११.०० वा. पंचायत समिती, सभागृह देसाईगंज.
आरमोरी पंचायत समिती – दु.३.०० वा. तहसिल कार्यालय, आरमोरी नविन प्रशासकीय ईमारत येथील सभागृहात.
धानोरा पंचायत समिती – स. ११.०० वा. तहसिल कार्यालय सभागृह, धानोरा.
गडचिरोली पंचायत समिती – दु. ३.०) वा. गोंडवाना कला केंद्र, पोटेगाव रोड, गडचिरोली. चामोर्शी पंचायत समिती – दु. ३.०० वा. पंचायत समिती सभागृह, चामोर्शी.
मूलचेरा पंचायत समिती – स. ११.०० वा.पंचायत समिती सभागृह मुलचेरा.
एटापल्ली पंचायत समिती – दु. ३.०० वा.पंचायत समिती सभागृ, एटापल्ली.
भामरागड पंचायत समिती – स. ११.०० वा. पंचायत समिती सभागृह, भामरागड.
अहेरी पंचायत समिती – स. ११.०० वा. पंचायत समिती सभागृह, अहेरी.
सिरोंचा पंचायत समिती – दु. ३.३० वा. पंचायत समिती सभागृह, सिरोंचा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here