गडचिरोली शहरात दारू विक्री केंद्र कुठे ? : गुगल मॅप दाखवतो पत्ता

7039

– गुगल मॅप वरील स्थळाला ४ स्टार रेटींग

The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑक्टोबर : गडचिरोली शहरात दारू विक्री केंद (बार) आहे असे म्हटल्यास ते एक मिश्किली आणि हास्यास्पद वाटण्यासारखे होईल. कारण जिल्ह्यात दारूबंदी आहे. पण जर गुगल मॅप वर दारू विक्री केंद्र गडचिरोली शहरात दाखवत असेल तर हे मात्र नक्की खर वाटेेल होय ना. असाच प्रकार घडलेला आहे. गुगल मॅप वर चक्क गडचिरोली शहरात दारू विक्री केंद्र असल्याचा पत्ता दाखवतो आहे. यामुळे आता गडचिरोली शहरात दारू विक्री केंद्र कधीपासून सुरू झाले असा प्रश्नही नवख्यांना अवश्य पडणारा आहे.
गडचिरोली जिल्हयात दारूबंदी आहे. शेजारील चंद्रपूर जिल्हयात दारू विक्री सुरू आहे. गडचिरोली जिल्हयात दारू बंदी असतांना दारू विक्री केंद्र जर गुगल मॅप वर दाखवित असेल तर नवखा शौकीन अवश्य गुगल मॅप च्या सहाय्याने त्याचा पत्ता शोधत त्या ठिकानापर्यंत पोहचेल. डिजिटल युग असल्याने जो तो इंटरनेटचा उपयोग करतात. आणि एखादी पत्ता जर मिळत नसेल तर गुगल मॅप चा अवश्य वापर करतात. गुगल मॅप वर गडचिरोली शहरात दारू विक्री केंद असल्याबाबत दाखवत असल्याने याबाबत सोशल मिडीयावर मिश्किली करतांनाचे दिसुन येत आहे. जिल्हयात दारू बंदी असतांना गुगल मॅप वर कसे काय दारू विक्री केंद्र दाखवत असेल असा सुध्दा प्रश्न उपस्थित होते आहे. आणि या दारू विक्री केंद्राच्या गुगल मॅप वरील स्थळाला 4 स्टार रेटींग सुध्दा पहावयास मिळत असून नक्कीच शहरात दारू विक्री केंद्र आहे असे सुध्दा नवख्यांना वाटेल हे सुद्धा नाकारता येणार नाही. सदर प्रकार हा जरी हास्यास्पद आणि मिश्किली करणारा वाटत असला तरी गुगल मॅपवर पत्ता दिसत असल्याने नक्कीच त्या ठिकाणी दारू विक्री केल्या जाते काय हे सुघ्दा शोधने आवश्यक असून याकडे पोलीस प्रशासन काय भुमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

©©©©©© (#gadchiroli news #Bar In Gadchiroli, #daruvikri kendr #gadchiroli #news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here