गडचिरोली : शहरातील तलावात आढळला इसमाचा मृतदेह

1707

– शहरात खळबळ
The गडविश्व
गडचिरोली,२० सप्टेंबर : शहरातील तलावात एका इसमाचा मृतदेह आढल्याची खळबळजनक घटना आज २० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटनेने शहरात एकाच खळबळ उडाली आहे. कुमोद रामदास लाटकर रा. रेव्हनी कॉलनी गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शहरातील मूल मार्गावर असलेल्या तलावात एका इसमाचा मृतदेह तरंगत असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळ गाठून मुतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्याकरिता पाठवण्यात आले. दुपारपर्यंत मृतक इसमाची ओळख पटली नव्हती. गडचिरोली पोलिसांनी तपासाचे चक्र अधिक वेगाने फिरवत मृतकाची ओळख पटविली असून मृतक हा गडचिरोली शहरातील रेव्हनी कॉलनी येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र सदर इसमाचा मृत्यू घातपाताने झाला की आत्महत्या याचे गूढ कायम असून पुढील तपास गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here