गडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेच्या प्रभाग रचनेच्या मसुद्यावर हरकती सूचना असल्यास नोंदवाव्यात : जिल्हाधिकारी संजय मीणा

164

– १० ते १७ मार्च पर्यंत हरकती सूचना नोंदविण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हाधिकारी गडचिरोली यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी राज्यातील माहे एप्रिल २०२० ते मार्च २०२२ या कालावधीत मुदत समाप्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषद, गडचिरोली व देसाईगंज येथील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नगरपरिषद क्षेत्र जितक्या प्रभागात विभागण्यात येईल, त्या प्रभागांची संख्या व त्याची व्याप्ती परिशिष्ट-2 व (हद्दीची व्याप्ती व वर्णन) आणि प्रभागदर्शक नकाशे निर्दिष्ट करण्याचे ठरवित असून जनतेच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सुचना फलकावर, नगर परिषद, गडचिरोली व देसाईगंज तसेच तहसिल कार्यालय, गडचिरोली व देसाईगंजच्या सूचना फलकावर उद्या गुरुवार दिनांक १० मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील नगरपरिषद, गडचिरोली व देसाईगंज क्षेत्रातील सर्व रहिवाश्यांच्या माहितीकरीता प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या प्रभाग रचनेच्या मसुद्यावर उद्या गुरुवार दिनांक १० मार्च २०२२ ते १७ मार्च २०२२ पर्यंत कार्यालयीन वेळेत हरकती व सूचना मागविण्यात येत आहेत. उक्त प्रभाग रचनेच्या मसुद्यास ज्या लोकांच्या काही हरकती/ सूचना असतील त्यांनी त्या पुराव्यासह संबंधित उपजिल्हाधिकारी/ उपविभागीय अधिकारी/मुख्याधिकारी यांचेकडे दिनांक १७ मार्च २०२२ (गुरुवार) रोजी किंवा तत्पुर्वी कार्यालयीन वेळेत लेखी स्वरुपात सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती/ सूचना विचारात घेण्यात येणार नाही. विहीत कालावधीत प्राप्त झालेल्या हरकती व सुचनांवर सुनावणी २२ मार्च २०२२ (मंगळवार) पर्यंत घेण्यात येईल, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी, गडचिरोली संजय मीणा यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here